Google Cloud Facilitator Program by Google

Google Cloud Facilitator Program by Google

Google Cloud Facilitator Program by Google

आर. सी. पटेल अभियांत्रिकीतर्फे गुगल क्लाऊड रेडी फॅसिलिटेटर उपक्रम संपन्न :


शिरपूर: येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे ' गुगल क्लाऊड रेडी फॅसिलिटेटर ' हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती प्रा.डॉ.जे.बी.पाटील यांनी दिली.
जगभरात प्रसिध्द असलेल्या गुगल तर्फे घेण्यात आलेल्या ' गुगल क्लाऊड रेडी फॅसिलिटेटर' हा उपक्रम राबविण्यात आला. ह्या नवोदित उपक्रमात तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या एकूण १७८ विद्याथ्यांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमात विद्यार्थ्यांना क्लाउड वापरुन कॉम्पुटेशन, अँप्लिकेशन डेव्हलपमेंट, बिग डेटा आणि मशीन लर्निंग या संकल्पना शिकण्याची आणि त्यावर सराव करण्याची संधी प्राप्त झाली. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गुगलकडून ‘फॅसिलिटेटर’ नेमण्यात आले होते, त्यासाठी फॅसिलिटेटर्सना गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण देण्यात आले. सदर उपक्रमात सहभागी फॅसिलिटेटर्सच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन संधीचा पुरेपूर उपयोग करून यश संपादित केले. सहभागी विद्यार्थ्यांपैकी १२३ विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. या उपक्रमात प्रत्येक विद्याथ्याने तीन ट्रॅक / मॉड्युल्स पूर्ण केले असून, गुगलने दिलेले १२८४ शोध आणि ६९९ कौशल्य बॅजेस पूर्ण केलेत. ह्या साधनांद्वारे गुगल शोध, जीमेल (Gmail) आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सना सहकार्य दिले जाते. 
यशस्वी पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना क्लाऊड कॉम्पुटिंग चे सखोल ज्ञान मिळाले. ह्या सर्टीफिकेशनमुळे त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील तसेच या उपक्रमा अंतर्गत क्लाउड-होस्ट केलेल्या शोध आणि कौशल्य बॅजेसचा वापर विद्यार्थी त्यांच्या व्यावसायिक नेटवर्कवर तसेच त्यांच्या व्यावसायिक प्रोफाइलमध्येही जोडू शकतात. ह्यामुळे त्यांच्या व्यावसायिक कौशल्यात भर पडेल. हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना गुगलकडून गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म नावाचे चिन्हांकित बॅजेस, स्टिकर, स्लिंग बॅग आणि लॅपटॉप बॅग भेट देण्यात आले. या उपक्रमाचे आयोजनासाठी संगणक विभाग प्रमुख डॉ.नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदीप सोनवणे, प्रा. मकरंद माळी, विद्यार्थी प्रतिनिधी चेतन माळी आणि भाग्यश्री पवार यांनी परिश्रम घेतले.
महाविद्यालयाच्या ह्या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.