Fees Structure (2020-21)

A) शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ चे शैक्षणिक शुल्क व विद्यापीठ शुल्क (Tuition Fee, Development Fee & University Registration Fee)

अ. क्र. तपशील शुल्क एकूण शुल्क (Total)
शैक्षणिक शुल्क(Tuition Fee) (*) विकास निधी (Development Fee) (*)
ओपन (OPEN) १,००,२६७/- १२,७३३/- १,१३,०००/-
ई. बी. सी. (EBC) ५०,१३४/- १२,७३३/- ६२,८६७/-
ओ. बी. सी. (OBC) ५०,१३४/- १२,७३३/- ६२,८६७/-
एस.सी. / एस.बी.सी. / एन.टी. / डी.टी.-व्ही. जे. / एस.टी. (SC / SBC / NT / DT-VJ / ST) ००/- १२,७३३/- १२,७३३/-
TFWS ००/- १२,७३३/- १२,७३३/-

(*) शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांनी या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी निश्चित केलेले शैक्षणिक शुल्क (Tuition fee) व विकास निधी (Development Fee). हे शुल्क विद्यार्थ्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील.

(#) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी निर्धारित केलेले अंदाजीत नोंदणी शुल्क (University Fee), रू. ५१३० इतकी रक्कम विद्यार्थ्याने आपल्या online banking प्रक्रियेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या बँक अकौंट मध्ये सूचना दिल्यानंतर दरवर्षी भरावयाचे आहे.

टीप:

  • (i) अ.क्र. २ व ३ च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काच्या (Tuition Fee) ५०% तसेच अ.क्र. ४ च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काच्या (Tuition Fee) १०० %, इतकी रक्कम, महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयात एका वर्षात जमा करते. याच प्रकियेला ‘शिष्यवृत्ती’ किंवा ‘फी प्रतिपूर्ती’ असे संबोधिले जाते. मात्र, ही ‘शिष्यवृत्ती’ किंवा हा ‘फी प्रतिपूर्ती’, या माहिती पुस्तिकेतील पुढे नमूद केलेल्या प्रपत्र ‘अ’, ‘ब’, ‘क’ मधील अटी व शर्ती प्रमाणे लागू राहतील. त्यांचे पालन न केल्यास किंवा अपूर्णता असल्यास आपणास अ.क्र. १ नुसार, महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क (ओपन, OPEN संवर्गाची) म्हणजेच रु. १,१३,०००/- इतके शुल्क जमा करणे अनिवार्य असेल.
  • (ii) महाविद्यालयाचे शुल्क व विद्यापीठ शुल्क हे DD किंवा Pay Order ने ‘The Principal, R. C. Patel Institute of Technology, Shirpur’ या नावाने जमा करावे. किंवा आपणास हे शुल्क महाविद्यालयाच्या Online प्रणालीद्वारेही भरता येईल. (प्रवेशादरम्यान बॅंकेचीही सुविधा महाविद्यालयाच्या आवारात उपलब्ध असेल)
  • (iii) प्रवेश रद्द व फी परताव्या बाबत –

    केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थांसाठी प्रवेश रद्द अटी व फी प्रतिपूर्ती, मा. आयुक्त, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका नियमावली – २०२० नुसार असेल.

B) वातानुकुलीत (AC) बस सेवा :

शिरपूर ते धुळे बस सेवा - (वार्षिक शुल्क रु. ३०,०००/- Non Refundable)

हे शुल्क DD किंवा Pay Order ने ‘The Principal, R. C. Patel Institute of Technology, Shirpur’ या नावाने जमा करावे.

C) वसतिगृह शुल्क (Hostel Fee) अंदाजीत तक्ता खालील प्रमाणे –

वसतिगृह(Hostel) वसतिगृह वार्षिक शुल्क (Hostel Annual Maintenance charges) वसतिगृह सुरक्षा ठेव (Hostel Deposit) वसतिगृह प्रवेश शुल्क (Hostel Admission Fee) एकूण (रु.) DD किंवा Pay Order खालील नावाने जमा करावे.
मुलांचे वसतिगृह २४,०००/- १०,०००/- २,०००/- ३६,०००/- SES Boys Hostel, Shirpur
मुलींचे वसतिगृह २२,०००/- १०,०००/- २,०००/- ३४,०००/- SES Ladies Hostel, Shirpur

टीप:

वसतिगृहात एकदा प्रवेश मिळाल्यानंतर अभ्यासाक्रमाच्या दरम्यान कुठल्याही प्रसंगी प्रवेश रद्द केल्यास सुरक्षा ठेवी व्यतिरिक्त कुठलीही रक्कम परत मिळणार नाही. तसेच सुरक्षा ठेव, ही आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा सदर अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द केल्यानंतरच देय राहील.

शैक्षणिक फी विषयीच्या सूचना:

1)  विद्यापीठ पात्रता फी व ई-सुविधा फी ही, डॉ बाबा साहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हरसिटी, लोणेरे यांनी ठरून दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी  आपल्या online बॅंक आकाउंट मधून विद्यापीठाच्या website वर  जाऊन https://dbatu.ac.in महाविद्यलयाकडून सूचना मिळाल्यानंतर भरावयाची आहे.

2) (##) शासनामार्फत मिळणारी वरील शिष्यवृत्ती पात्र होण्यासाठी शासकीय विभागाच्या संकेतस्थळावरऑनलाईन  अर्ज करून संबंधित सर्व कागदपत्रे  महाविद्यालयाने ठरून दिलेल्या वेळेत जमा करणे  अनिवार्य आहे. सदर  शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासन यांच्या वेळोवेळी प्रकाशित झालेल्या शासन  निर्णयाप्रमाणे  लागू राहील.

3) ज्या विद्यार्थ्यांचे  अर्ज शिष्यवृत्तीसाठी  नामंजूर होतील अश्या विद्यार्थ्यांना शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांनी    निश्चित केलेले शिक्षण शुल्कची ओपन   प्रवर्गाची पूर्ण फी भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी.
4)आपण वरील फी online / offline पद्धतीने भरू शकतात. सोबत त्याबाबतचे manual जोडलेले आहे.