Received Second prize in Racing Car Competition

 Received Second prize in Racing Car Competition

Received Second prize in Racing Car Competition

रेसिंग कार स्पर्धेत द्वितीय  पारितोषिक प्राप्त:

आर सी पटेल अभियांत्रिकीच्या संघाचा आ. पटेल याच्या हस्ते गौरव :

शिरपूर :- सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनियर्स अंतर्गत गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मेगा एटीव्ही चॅम्पियनशिप 2021 या चित्तथरारक  रेसिंग कार या स्पर्धेत आर. सी. पटेल इंन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय पारितोषिक मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री अमरिशभाई पटेल यांनी गौरव केला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी , धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी पाटील हे उपस्थित होते.  आ. अमरिशभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांकडून सदर स्पर्धेचे स्वरूप आणि व्याप्ती तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वाहनाची तांत्रिक माहिती जाणून घेतली. कार रेसिंग स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थी संघाचे कौतुक करीत समाधान व्यक्त  केले.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनियर्स तर्फे या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील मेगा एटीव्ही चॅम्पियनशिप 2021 या चित्तथरारक  रेसिंग कार या स्पर्धेचे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते.  दोन टप्प्यात झालेल्या या  स्पर्धे भारतातून ६०० हून अधिक संघ सहभागी  झाले होते. स्पर्धेच्या  पहिल्या  टप्प्यात  व्हर्च्युअल  माध्यमातून  लेखी परीक्षा आणि कार डिजाईनचे सादरीकरण करण्यात आले. यात आर .सी . पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या इंजिन बेस कारच्या डिझाइंनची  निवड झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या डिझाईन नुसार  कारचे मॉडेल बनवले गेले व त्याचे परीक्षण  झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार गोवा येथे झालेल्या रेसिंग स्पर्धेत यशस्वीरित्या धावली. विद्यार्थ्यांनी तयार महाविद्यालयाच्या कार्यशाळेत तयार केलेल्या या कारचे तांत्रिकदृष्ट्या विविध स्तरावर परीक्षण झाले. कार निर्मिती क्षेत्रातील तज्ञ परीक्षक म्हणून काम पाहत असतात. त्यात रेसिंग कारची डिझाईन, गतिशीलता, ब्रेक, स्टिअरिंग, ट्रान्समिशन, वाहन सुरक्षितता अशा बऱ्याच चाचण्या घेतल्या जातात. परीक्षणानंतर आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंजिन बेस कार मध्ये भारतातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याच बरोबर  नाईट एनडयुरन्स ह्या उच्च काठीण्य व खडतर चाचणीत ससीचणीतयनडयुरन्स ह्या उच्च काठिलग तीन तास न थांबता धावत या कारने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या ऋषिकेश पाटील, सागर पाटील, विशाल पाटील व निखिल माळी या विद्यार्थ्यांच्या समूहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी प्राध्यापक विजय जाधव व प्राध्यापक पंकज बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्क्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे ,परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन आदी उपस्थित होते.

आर सी पटेल मोटार स्पोर्टस् क्लब:- महाविद्यालयाने मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखे अंतर्गत आर सी पटेल मोटार स्पोर्टस् क्लब ची स्थापना केलेली आहे . विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित होत असलेल्या विविध कार डिझाईनिंग व रेसिंग स्पर्धांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची व वैशीष्ठांची चारचाकी वाहनांच्या निर्मितीचे काम या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी वर्षभर करीत असतात. या साठी विद्यार्थ्याना सर्व प्रकारची उपकरणे व स्पेअर पार्टस महाविद्यालया मार्फत उपलब्ध करून दिले  जातात. तसेच दरवर्षी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  विद्यार्थ्यांना  महाविद्यालय आर्थिक मदत करून प्रोत्साहित करीत असते. या मुळेच महाविद्यालयातील  विद्यार्थी उत्साहाने व हिरारीने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवीत उल्लेखनीय यश संपादित करीत असून आता पर्यंत तीन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकाविली आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कार निर्मितीचे कौशल्य विकसित होत आहे.