शिष्यवृत्ती (फी परतावा) मिळण्यासाठी चे अटी व शर्ती
- १) शिष्यवृत्ती (Scholarship) आवश्यक कागदपत्रे प्रपत्र – ‘ब’ (Refer Documents Required Section) प्रमाणे आवश्यक आहेत.
- २) शासकीय प्रवेश – आपला प्रवेश शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) मधून झालेला असावा.
- ३) पालकांच्या उत्पन्नाची अट -
- शिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) साठी ओ.बी.सी., एस.बी.सी, एन.टी. (OBC, SBC, NT) या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वित्तिय वर्ष २०१९-२० (३१ मार्च २०२१ पर्यंत वैध) चे उत्पन्न रु. ८.०० लाखाच्या आत असावे.
- ईबीसी (EBC) संवर्गासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रु. २.५० लाख पर्यंत आहे तसेच ज्या पालकांचे उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा जास्त व रु. ८.०० लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यानाही ईबीसी (EBC) चा लाभ मिळू शकतो परंतु अश्या विद्यार्थ्यांना १२ वीत कमीतकमी ६०% गुण (किंवा डिप्लोमा च्या आधारे प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत एकूण ५०% गुण) आवश्यक आहेत.
- ४) शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज (Scholarship Online Application Form)
शासनाने निर्धारित केलेल्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज वेळेत mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रिंट आवश्यक त्या कागद पत्रासह दिलेल्या वेळेत महाविद्यालयात जमा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील.
- ५) महाविद्यालयात हजेरी
विद्यार्थ्याची महाविद्यालयात हजेरी किमान ७५% असणे अनिवार्य आहे.
- ६) विद्यापीठ परीक्षा
विद्यार्थ्यांने प्रथम सत्र व व्दितीय सत्राच्या परिक्षेचा अर्ज भरणे व परीक्षा देणे अनिवार्य राहील.
- ७) अपत्यांची संख्या
शिष्यवृत्ती सर्व संवर्गातील मुलांसाठी (male) रेशनकार्ड प्रमाणे दोन (२) अपत्यांपर्यंत मर्यादित राहील.
शिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) चा लाभ मिळण्यासाठी वर नमूद केलेल्या सर्व अटींचे पालन करणे व पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा आपणास, शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई (FRA, Mumbai) यांनी या महाविद्यालयास मंजूर केलेले शुल्क रु. १,१३,००० लागू राहील याची नोंद घ्यावी
- ८) शिष्यवृत्ती साठी अपात्र विद्यार्थी -
- विद्यार्थ्यांने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी, सन २०१९-२०२० अगोदर इतरत्र पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम अर्धवट सोडलेला असल्यास असे विद्यार्थी; (किंवा)
- वर नमूद केलेल्या क्रमांक १ ते ७ अटींप्रमाणे पात्र नसल्यास; (किंवा)
- विद्यार्थ्यांने या महाविद्यालयातील अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर पुढील एकूण अभ्यासक्रमाच्या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाल्यास;
- ९) शिष्यवृत्ती प्रक्रिये संबधीत महत्वाचे संकेतस्थळ (वेबसाईट) - www.mahadbt.gov.in
- शिष्यवृत्ती (Scholarship) SC/SBC/NT/DT-VJ/OBC
- शिष्यवृत्ती (Scholarship) ST
- ऑनलाईन शिष्यवृत्ती (Online Scholarship)