RAHAT - Social Activity by Department of Computer Engineering

RAHAT - Social Activity by Department of Computer Engineering

RAHAT - Social Activity by Department of Computer Engineering

भावी अभियंत्यांनी दिली गारठ्यात आपुलकीची ऊब :

भावी अभियंत्यांमध्ये विद्यार्थी जीवनातच सामाजिकतेची जाणीव व्हावी , तसेच आपण समाजाला काही देणे लागतो ही भावना रुजावी यासाठी महाविद्यालयातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.ह्या अंतर्गत महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी ई-बिल्डर ग्रुपची स्थापना केलेली आहे. ह्या ग्रूप च्या द्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ई-बिल्डर ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून आदिवासी पाड्यांवरील गरजूंना व उसतोड कामगारांना ६०० हुन अधिक स्वेटर ,शाल, टोपी, मफलर ई. गरम व ऊलन कपड्यांचे वाटप केले. या बरोबरच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लिश प्रायमर या पुस्तकाचे व खाऊ स्वरूपात बिस्कीट पुड्यांचे आणि केळी वाटप करण्यात आले.

ह्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शकील पिंजारी, प्रा. संदीप सोनवणे ,प्रा. रोहिदास सांगोरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व विद्यार्थी स्वयंसेवकांमधून प्रेरणा बोरसे, प्रतीक्षा भावसार, हितेश मराठे, मनीष चौधरी, सिद्धी कुलकर्णी,तन्मय चव्हाण ,अंजली पवार,धनश्री सनेर यांनी परिश्रम घेतलेत.

महाविद्यालयाच्या ह्या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, डॉ.सतीष देसले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केल.