College Level Avishkar 2022

College Level Avishkar 2022

College Level Avishkar 2022

पटेल अभियांत्रिकीच्या १२ संशोधकांची ‘आविष्कार- २०२२’ विभागीय स्तरावर निवड:

शिरपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ अंतर्गत येथील आर. सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे १९ नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालय स्तरीय ‘आविष्कार- २०२२’ या भित्तीपत्रक प्रदर्शन आणि सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेचे उद्घाटन इन्फोसिस मध्ये सीनियर कॉम्प्युटर सायंटिस्ट पदावर कार्यरत असलेले पटेल अभियांत्रिकीचेच माजी विद्यार्थी श्री प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

‘आविष्कार- २०२२’ या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांचे पोस्टर आणि मॉडेलचे भेटी देणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर सादर केले. पहिल्या फेरीत सर्व स्पर्धकांनी सुरुवातीला पोस्टर आणि मॉडेलचे सादरीकरण केले त्यातून काही विद्यार्थी पुढील फेरीसाठी निवडण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन कार्य, पीपीटी सादरीकरणाच्या स्वरूपात सादर करण्यास सांगितले. पोस्टर आणि त्याच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, विभाग प्रमुख डॉ. एन. एन. पाटील, डॉ. आर. बी. वाघ, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तापकिरे तसेच डॉ. यू. एम. पाटील, , प्रा. पी. आर. भोळे, डॉ. आर. डी. बडगुजर, डॉ. एम. बी. डेंबराणी, डॉ. डी. आर. पाटील या प्राध्यापक मंडळींची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

‘आविष्कार- २०२२’ या संशोधन कार्यावर आधारित पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, वैद्यकीय आणि फार्मसी, विज्ञान, मानविकी, भाषा, ललित कला आणि वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा या सहा विषयांवर आधारित होती. यांत पदवीस्तरावर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयात विद्यार्थी श्रेणीत राजपूत चेतन नवनीत, मानसी नंदुलाल सोनवणे आणि साक्षी विजय बडगुजर यांना प्रथम क्रमांक तर पाटील प्रेमकुमार वामन, प्रथमेश माळी, हर्षल म्हस्के, तन्मय महाले यांना द्वितीय क्रमांक मिळाला तसेच शिक्षक श्रेणीत प्रथम क्रमांक प्रा. लोमेश शशिकांत महाजन यांनी मिळविला.

मेडिसिन आणि फार्मसी विषयात प्रथम विजेता अक्षय बडगुजर, गुणवंत देसले, दिपक माळी, कुणाल सोनवने तर द्वितीय क्रमांक धनश्री पंकज सनेर, भारत प्रेमसिंग राजपूत, ह्युमॅनिटीज, लँग्विजीस, फाईन आर्ट्स या विषयांत प्रथम क्रमांक आदिल भिकन खाटीक, मन्यार अबुजार जमील तर द्वितीय क्रमांक कासार समर्थ राकेश, सोनवणे चिन्मय रवींद्र, कृषी आणि पशुसंवर्धन शाखेत प्रथम क्रमांक दर्शन घुगे व द्वितीय क्रमांक ओम राकेश पाटील आणि प्युअर सायन्स शाखेतून प्रथम क्रमांक कौस्तुभ रवींद्र बोरसे, यश सूर्यकांत पवार यांनी पटकवला. यानंतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले व पुढील विभागीय स्तरावर आविष्कार स्पर्धेत पटेल अभियांत्रिकीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘आविष्कार- २०२२’ आयोजन समितीचे समन्वयक डॉ. तुषार जावरे तसेच प्रा. जे. पी. पाटील, प्रा. जे. एस. खाटिक, प्रा. एस. एस. सोनवणे, प्रा. एम. एन. पाटील, प्रा. एस. एम. परदेशी आणि अभिषेक श्रॉफ यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालय स्तरीय ‘आविष्कार- २०२२’ मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.