Gold Medals of Academic Year 2019-20

Gold Medals of Academic Year 2019-20

Gold Medals of Academic Year 2019-20

आर.सी.पटेल अभियांत्रिकीच्या सुवर्ण पदक प्राप्त:

विद्यार्थ्यांचा आ.पटेल यांच्या हस्ते गौरव  :

शिरपूर: येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखातील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ऑक्टोबर  २०२०  मध्ये झालेल्या अभियांत्रिकी शाखांच्या परीक्षेत ५ सुवर्णपदके पटकावीत महाविद्यालयाच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी , धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी पाटील हे उपस्थित होते.

अभियांत्रिकी विद्याशाखांची गुणवत्ता यादी निकाल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकतीच  जाहीर झाली . यात येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेतील बिरारी सुचिता संजय, मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतील पाटील करण साहेबराव, इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी शाखेतील चौधरी अश्विनी प्रकाश तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेतील परदेशी दिव्या दिनेशसिंग या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत सुवर्ण पदके पटकाविले. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या परदेशी दिव्या या विद्यार्थिनीने अभियांत्रिकी शाखेत सर्व मुलींमध्ये विद्यापीठात प्रथम येत दुसऱ्या सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते सुवर्णपदके प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. प्रवीण सरोदे , प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. व्ही. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजनआदी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कौतुक करीत समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना विषाणूच्या पादुर्भावामुळे शासकीय निर्बंधाचे पालन करीत  महाविद्यालयाने काटेकोर नियोजन करून  वेबेक्स व झूम च्या माध्यमातून द्वितीय सत्रात तासिका व प्रात्यक्षिके ऑनलाईन पद्धतीने घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयाने मूडलप्रणालीच्या द्वारे भरपूर सराव परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे सातत्य कायम राखले होते याचाच फायदा विद्यार्थ्यांना झाला असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान  शिक्षणाचा कायाकल्प व्हावा या साठी  राज्य शासनाने सुरु केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी महाविद्यालय २०१७ पासून संलग्न झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महाविद्यालयाची हि शेवटची बँच व निकाल होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत आत्ता पर्यंत महाविद्यालयाने एकुण ४७ सुवर्ण पदके पटकावली असून निकालात अनेक कीर्तिमान स्थापित केलेले आहेत याचेच समाधान आहे.शैक्षणिक गुणवत्तेसह सॉफ्ट स्कील,व्यक्तीमत्व विकास, मुलाखत तंत्र मार्गदर्शन या सह राबविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणे व उपक्रमांमुळे महाविद्यालयाला प्लेसमेंट मध्येही उल्लेखनीय यश प्राप्त होत आहे. कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितही या वर्षी महाविद्यालयातील ३४७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विविध कंपनीत उच्च वेतन श्रेणीवर निवड झालेली असून अजून अनेक कंपन्या साठी ची निवड प्रक्रिया सुरु आहे.