Honeywell - Center of Excellence Inauguration

Honeywell - Center of Excellence Inauguration
पटेल अभियांत्रिकीत हनीवेल सोफ्टवेर कंपनीतर्फे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे झाले उद्घाटन:
शिरपूर: येथील पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात हनीवेल या सोफ्टवेर क्षेत्रातील नामांकित कंपनी तर्फे आज १६ नोव्हेंबर २०२२ रोजी कॉर्पोरेट आणि सोशल रिस्पोन्सीबिलीटी या मोहिमे अंतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
हनीवेल हि सोफ्टवेर क्षेत्रातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनीच्या वार्षिक कॉर्पोरेट आणि सोशल रिस्पोन्सीबिलीटी (CSR) या मोहिमे अंतर्गत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. याचपैकी तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना उदयन्मुख तंत्रज्ञानातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण प्राप्त करून देण्यासाठी या वर्षी चेन्नई स्थित ICT या तंत्र शिक्षण प्रबोधनीच्या माध्यमातून काही निवडक तंत्र महाविदायाल्याची निवड करायची होती. यासाठी महाविद्याच्या सकारात्मक प्रर्तीसाद आणि तसेच तांत्रिक आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करणे आवश्यक असते. याच वरील सर्व बाबी लक्षात घेता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी हनीवेल या कंपनी तर्फे महाराष्ट्रातील केवळ १० महाविद्यालायंची निवड करण्यात आली. यात शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत माहिती तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. सध्या ११० विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच AWS क्लाउड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मोफत घेत आहेत. प्रशिक्षण वर्गाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना AWS क्लाउड तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सदर प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात सोफ्टवेर क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील.
पटेल अभियांत्रिकीत नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला आयसीटीचे राज्य प्रमुख श्री. मोहम्मद इरफान, वरिष्ठ प्रशिक्षक सचिन दरेकर, आयसीटी विभागीय समन्वयक श्री. निखिल मुरकुटे, महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे उपस्थित होते. हनीवेल आणि ICT च्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे समन्वयक म्हणून महाविद्य्लायाचे रिसर्च & डेव्हेलप्मेंटचे अधिष्टता डॉ. तुषार जावरे आणि ट्रेनिंग & पेलेस्मेंट अधिकारी प्रा. मिल्केश जैन, प्रा. अनुप जयस्वाल, प्रा. विनीत पटेल, प्रा. मयूर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. स्मितल पाटील यांनी केले.
हनीवेल या सोफ्टवेर कंपनीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ च्या उद्घाटनाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा
नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.