Vihangam 2023

Vihangam 2023

Vihangam 2023

 

आर.सी.पटेल अभियांत्रिकीच्या टीम समर्पणतर्फे विहंगम 2023 चे आयोजन:

आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या टीम समर्पणने एक पाऊल पुढे टाकत पक्षांसाठी जम्बो बर्ड फीडरबनवत निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून सर्वच जीव पाण्यासाठी आसुसलेले असतात, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांना अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण, झाडे-वनस्पती, प्राणी-पक्षी यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे
अश्यातच पक्षी, पाणी आणि अन्नाच्या शोधात फिरताना दिसतात. हिच बाब लक्षात घेऊन पक्षांना कडक उन्हात आधार देण्यासाठी विहंगम 2023 चे आयोजन करण्यात आले. या साठी टीम समर्पण मधून 25 हून अधिक सदस्य सक्रियपणे सहभागी झाले . विद्यार्थ्यांनी पत्र्याचे तेलाचे डबे वापरून टाकाऊ पासून टिकाऊ असे बर्ड फीडर तयार केले, तसेच कौशल्य वापरत स्वत: रंगवून त्यांना आकर्षक रूप दिले.


या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे.बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपस्थित प्राध्यापकांना बर्ड फीडर दिलेत. या वेळी उपसंचालक डॉ. पी. जी. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, टी.पी.ओ. प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, डॉ.जे.बी.जाधव उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता डॉ.अमृता भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वसतिगृह परिसर, कॅन्टीन परिसर, भगवंत पार्क, नरडाणा उड्डाणपूल, विविध सोसायट्या, वसाहती व शहरातील विविध भागात हे बर्ड फीडर्स ठेवण्यासाठी प्रा.पंकज बाविस्कर, प्रा.निलेश शिंदे, प्रा.भूषण मोरे, प्रा.अनिल कुंभार, आणि डॉ.विजय पाटील यांनी पुढाकार घेतला. या व्यतिरिक्त महाविद्यालयातील इच्छुक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-र्यानी बर्ड फीडर घेत पक्षांची क्षुधा व तृष्णा भागवण्याची हमी दिली.