Evosys Campus Placement 2021-22 Batch

Evosys Campus Placement 2021-22 Batch

Evosys Campus Placement 2021-22 Batch

आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या ११ विदयार्थ्यांची सिस्टीम इंजिनिअर पदी इव्होसिस कंपनीत निवड :

शै.वर्षं २०२१-२२ च्या सुरुवातीलाच २३२ प्लेसमेंट:

शिरपूर :- येथिल आर. सी. पटेल इंन्स्टिट्य़ुट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची इव्होल्युशनरी प्रा. ली. म्हणजेच इव्होसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत सिस्टीम इंजिनिअर पदावर निवड झाली आहे. या शैक्षणिक वर्षीच्या प्रथम तीन महिन्यातच २३२ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करीत महाविद्यालयाने दमदार कामगिरीस सुरुवात केली आहे. यात टीसीएस, कँपजेमिनी, अँटोस ग्लोबल, इन्फोसिस,पर्सिसटंट, केपीआयटी, रिलायंस जिओ अश्या नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही महाविद्यालयाने मागील वर्षी उच्चांकी ५८० प्लेसमेंटस करून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

वैद्यकीय , हॉटेल्स व्यवस्थापन , उत्पादन आणि बांधकाम , आर्थिक क्षेत्र ,व्यावसायिक सेवा , उच्च शिक्षण व अभियांत्रिकी अशा सर्वच क्षेत्रात ओरँकल ही संगणक प्रणाली जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात वापली जाते. या प्रणालीच्या सहाय्याने या क्षेत्रातील दैनदिन कामकाजासाठीचे विविध प्रकारचे संसाधने (सॉफ्टवेअर) तयार करून त्याचे अद्ययावतीकरण व विस्तारीकरणा चे काम , या प्रणालीचे प्रशिक्षणआदी सेवा प्रदान केल्या जातात. इव्होसिस ही नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी असून कंपनीचेमुख्यालय साउथ कोरिया येथे तर भारतातील कार्यालय अहमदाबाद येथे आहे.

जगभरात ४० हून अधिक देशांमध्ये कंपनीचे १२०० पेक्षा जास्त प्रमुख कंपन्या ग्राहक आहेत, अशा प्रतिष्ठित व अभियांत्रिक क्षेत्रात महत्वाच्या या कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन आर.सी.पटेल.अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच करण्यात आले. यात महाविद्यालयातील सर्व शाखांमधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तीन स्तरावरील निवड प्रक्रियेत सुरवातीला विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक चाचणी यशस्वीपणे पार करीत शेवटी वैयक्तिक मुलाखती दिल्यात.

यात पाटील हर्षिता यादवेश्वर, बच्छाव दिपाली प्रदीप, लोहार राधिका भोजुलाल,भामरे अंकिता उदय, जमदाडे वैष्णवी राजेश, अग्रवाल अदिती विजय,चौधरी जयेश भरत, जांगीड हरिष सतीष, गांगुर्डे विक्रांत शामराव, राजपूत शुभम दरबारसिंग, पाटील हर्शल कन्हैयालाल या विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांची वार्षिक ३.६ लाख रुपये वेतश्रेणीवर सिस्टीम इंजिनिअर या पदी निवड झाली. निवड व मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, प्रा.एस.एन परदेशी, प्रा.रघुवंशी व प्रा. पी.एस.पाटील यांनी परिश्रम घेतलेत.

मागील दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीतही शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा कायम राखत महाविद्यालयाने आता पर्यंत सुमारे ८०० विद्यार्थ्याना नोकरी मिळवून दिली आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्धरित्या केलेल्या प्रयत्नांचे हे फळ असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे बी पाटील यांनी सांगितले.

सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे ,परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा.डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.

May be an image of 11 people and text