Student Induction Program

Student Induction Program

Student Induction Program

शिक्षणाला कौशल्याची जोड देत आव्हानांना सामोरे जा – संचालक डॉ.जे.बी. पाटील

आर.सी पटेल अभियांत्रिकीत स्टुडेंट इंडक्शन प्रोग्रामची उत्साहात सुरुवात:

शिरपूर : येथील आर. सी पटेल अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच आर.सी.भंडारी हॉल मेन बिल्डींग शिरपूर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी संचालक डॉ. जे.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.


प्रथम वर्षात प्रवेश घेत असतांना विद्यार्थी अनेक मानसिकतेतून जात असतो. नवीन महाविद्यालय, नवीन मित्र, प्राध्यापक, अभ्यासक्रम आणि नवीन वातावरणाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका तसेच भीती असते. ह्याचा परिणाम त्यांच्या पुढील जडणघडणीवर होऊ शकतो. तसे न होऊ देता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांच्या नवीन शैक्षणिक पर्वाची सुरुवात त्यांनी आनंदाने करावी ह्यासाठी आर.सी. पटेल अभियांत्रिकीने २ आठवड्यांचा परिपूर्ण स्टुडेंट इंडक्शन प्रोग्राम तयार केला आहे त्यात योगा, झुंबा, कला, नृत्य, संगीत, वादविवाद, खेळ इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये वैश्विक मानवी मूल्ये, नैतिक मुल्ये शारीरिक आरोग्य, सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य, सामाजिक जबाबदारी, प्रेझेंटेशन स्किल्स यासारख्या विषयांवर प्रख्यात लोकांची प्रेरक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. संचालक डॉ. जे.बी. पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्माचे उद्घाटन करण्यात आले.


शालेय ते महाविद्यालयीन जीवनातील प्रवास हा विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात आव्हानात्मक प्रवास असतो. १२वी नंतरचे शिक्षण घेताना चांगले महाविद्यालय निवडणे हे अतिमहत्वाचे ठरते. ऑटोनॉमस महाविद्यालयाचे महत्व सांगत त्याचे विवधअंगी फायदे सांगितलेत. विद्यापीठाच्या परीक्षेत सुवर्ण पदके व गुणवत्ता यादीत स्थान मिळवीत असतांनाच विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते.महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट विभागातर्फे वर्षभर विविध कंपनी व त्यातील अधिकारी वर्गाशी संपर्कात राहून कंपनीतर्फे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू साठी मेहनत घेतली जाते. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर आवश्यक कौशल्य आत्मसाद करण्यासाठी महाविद्यालयातर्फे मुंबई , पुणे येथील नामांकित संस्थां मार्फत द्वितीय वर्षा पासूनच प्रशिक्षण दिले जाते. तसेच जागतिकीकरणाचा विचार करत परदेशी भाषा प्रशिक्षणा अंतर्गत जपानी भाषेसाठी (जेएलपीटी) व जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग हे अभ्यासक्रम सुरु केले आहे. कॅम्पस ड्राईव्ह प्रक्रियेसाठी व आवश्यकतेनुसार मॉक ग्रुप डिस्कशन्स, वैयक्तिक आणि तांत्रिक मुलाखतीं संदर्भात वर्षभर मार्गदर्शन केले जाते. पटेल अभियांत्रिकीला उत्तम शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि कॅम्पस प्लेसमेंट ची गौरवशाली परंपरा आहे
आणि ह्या परंपरेचा भाग झाल्या बद्दल संचालक डॉ. जे.बी.पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रथमवर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीष देसले तसेच मुख्य समन्वयक म्हणून स्टुडेंट अफेअर्सच्या अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी यांनी परिश्रम घेतलेत तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ठाकरे व प्रा. योगेश विसपुते यांनी केले. प्रा. विजय इशी यांनी आभार व्यक्त केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे तसेच सर्व विभाग प्रमुख आणि विविध समित्यांचे अधिष्ठाता आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे,परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा.डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.