Teachers Day Celebration News

Teachers Day Celebration News
आर. सी. पटेल अभियांत्रिकीत शिक्षकदिन उत्साहात साजरा :
येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सक्षम ह्या विद्यार्थी कार्यक्रम समूहाच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ह्यावेळी आपले अनुभव सांगत शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली नंदिनी पाटील ह्या विद्यार्थिनीने चलो केह्ती हु कुछ अल्फाज में हि शिक्षकांना समर्पित कविता सादर केली. हर्षिता पाटील हिने सुत्रसंचलन केले. “शुक्रिया शुक्रिया” हे शिक्षकांप्रती आदर व त्यांचे महत्व सांगणारे हिंदी गीत दृकश्राव्य माध्यमातून लावण्यात आले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे व विविध विभाग प्रमुख यांनी केक कापून सर्वांना शिक्षक दिनाच्या गोड शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्टुडंट अफेअरच्या अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी तसेच विदयार्थी स्वयंसेवकांमध्ये अमन पांडे, अनुराग जमादार, दर्शन घुगे, तेजस सूर्यवंशी, श्वेता साळुंखे, वैष्णवी करंकाळ, अभय कोठावदे, सुरभी मराठे, , राजश्री पाटील, वैष्णवी बाविस्कर, नंदिनी पाटील या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना धन्यवाद देत मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा.डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .