2nd Prize in National Mega ATV Championship 2021

2nd Prize in National Mega ATV Championship 2021

2nd Prize in National Mega ATV Championship 2021

शिरपूर :- सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनियर्स अंतर्गत गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मेगा एटीव्ही चॅम्पियनशिप 2021 या चित्तथरारक रेसिंग कार या स्पर्धेत आर. सी. पटेल इंन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय पारितोषिक मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी पाटील यांनी दिली. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनियर्स या संस्थे तर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार रेसिंग स्पर्धेत महाविद्यालायाच्या संघाने सातत्याने पारितोषिके मिळविले असून या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावीत यशाची परंपरा कायम राखली असल्याचे प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनियर्स तर्फे या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील मेगा एटीव्ही चॅम्पियनशिप 2021 या चित्तथरारक रेसिंग कार या स्पर्धेचे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते. दोन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत भारतातून ६०० हून अधिक संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा पहिल्या टप्प्यात व्हर्च्युअल माध्यमातून लेखी परीक्षा आणि कार डिजाईनचे सादरीकरण करण्यात आले. यात आर .सी . पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या इंजिन बेस कारच्या डिझाइंनची निवड झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या डिझाईन नुसार कारचे मॉडेल बनवले गेले व त्याचे परीक्षण झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार गोवा येथे झालेल्या रेसिंग स्पर्धेत यशस्वीरित्या धावली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारचे तांत्रिकदृष्ट्या विविध स्तरावर परीक्षण झाले. कार निर्मिती क्षेत्रातील तज्ञ परीक्षक म्हणून काम पाहत असतात. त्यात रेसिंग कारची डिझाईन, गतिशीलता, ब्रेक, स्टिअरिंग, ट्रान्समिशन, वाहन सुरक्षितता अशा बऱ्याच चाचण्या घेतल्या जातात. परीक्षणानंतर नुकत्याच लागलेल्या निकालानुसार आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंजिन बेस कार मध्ये भारतातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याच बरोबर नाईट एनडयुरन्स ह्या उच्च काठीण्य व खडतर चाचणीत ही सलग तीन तास न थांबता कार धावली व संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या ऋषिकेश पाटील, सागर पाटील, विशाल पाटील व निखिल माळी या विद्यार्थ्यांच्या समूहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी प्राध्यापक विजय जाधव व प्राध्यापक पंकज बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे ,परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा.डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांमध्ये कार निर्मितीचे कौशल्य विकसित व्हावे या साठी महाविद्यालयाने मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखे अंतर्गत आर सी पटेल मोटर्स क्लब ची स्थापना केलेली आहे . राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित होत असलेल्या विविध कार डिझाईनिंग व रेसिंग स्पर्धांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची व वैशीष्ठांची चारचाकी वाहनांच्या निर्मितीचे काम या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी वर्षभर करीत असतात. या साठी विद्यार्थ्याना सर्व प्रकारची उपकरणे व स्पेअर पार्टस महाविद्यालया मार्फत उपलब्ध करून दिले जातात. तसेच दरवर्षी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय आर्थिक मदत करून प्रोत्साहित करीत असते. या मुळे विद्यार्थी उत्साहाने व हिरारीने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवीत   उल्लेखनीय यश संपादित करीत असल्याचे दिसून येत आहे. –प्राचार्य डॉ. जे बी पाटील