Atos Global Campus Placement 2021-22

Atos Global Campus Placement 2021-22

Atos Global Campus Placement 2021-22

आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या ६५ विदयार्थ्यांची एटोस ग्लोबल मध्ये निवड:

शिरपूर :- आंतराष्ट्रीय स्तरावर डिजिटल सोल्युशन्स आणि सुरक्षा या क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या एटोस ग्लोबल या कंपनीत येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण ६५ विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनिअर पदी वार्षिक रु. ३.१० लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली. मागील वर्षात महाविद्यालायातीने नामांकित कंपनीत केलेल्या ६४० प्लेसमेंटसच्या विक्रमी कामगिरी नंतर या म्हणजेच शै. वर्ष २०२१-२२ मध्ये सुरुवातीलाच ३७३ प्लेसमेंटस करीत दमदार सुरुवात केलेली आहे. या शिवाय अनेक नामाकीत कंपनीनच्या मुलाखत प्रक्रिया नियोजित असल्याची माहिती संचालक डॉ. पाटील यांनी दिली.

येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय व एटोस ग्लोबल या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विषेश कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. यात पात्र विद्यार्थ्याना बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत व शेवटी वैयक्तिक मुलाखत अश्या तीन स्तरिय निवड प्रक्रीयेला सामोरे जावे लागले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयातील ६५ विद्यार्थ्याची कंपनीने वार्षिक ३.१० लाख रुपये या वेतनश्रेणी वर ट्रेनी इंजिनिअर म्हणून निवड केली आहे. यात पाटील रिया विजय, पाटील हर्षिता किरणकुमार, पाटील योगेश्वरी नरेंद्र, माहेश्वरी राशी अजय, देसाई मृणाल राजेंद्र, पाटील प्रियंका नितीन, गिरासे साक्षी गजेंद्र, पाटील जागृती सुरेश, अरुजा जुही चेतन, कलाल रोहन गजेंद्र, परिख रुपल गोपाळ, पाटोळे श्रुती गणेश, विसाळे प्राजक्ता नरेंद्र, बाविस्कर राजन चंद्रशेखर, जैन हिमांशू दिनेश, पाटील शिवानी विलास, वर्मा साक्षी दिनेश, सोनवणे जयदीप किशोर, पटेल मयुरी पंकजभाई, चौधरी श्रुती अनिल, धाकड मयुरेश उल्हास, शाह भूमी दिलीप, महाजन निशांत भाटू, चौधरी रुतिक रवींद्र, बोरसे पियुष संजय, सूर्यवंशी रोहन नितीन, जिरे मोहन धनराज, पौर्णिमा शैलेंद्रसिंग सोळंकी, सावळे प्रतीक अनिल, पाटील रोहन बाजीराव, सर्वय्या ध्रुव नारायण, गोसावी रामकृष्ण मोतोगीर, नांदरे धनश्री सुनील,

मोहने प्रियांका नंदलाल, पाटील प्रतिक्षा प्रवीण, चौधरी नेहा ज्ञानेश्वर, महाजन चेतन जितेंद्र, महाले देवयानी सुधाकर, महाजन मानसी राजेंद्र, सैंदाणे अक्षयकुमार, किशोर, अग्रवाल आदिती विजय, चौधरी तेजल चंद्रकांत, जैन रिद्धी लक्ष्मिकांत, आसापुरे साक्षी राजेश, पाटील रोहित संजय, सावंत घनशाम उद्धव, दर्जी जय वसंत, कोळे तृप्ती प्रशांत, नेहा रामकुमार दुसेजा, पूजा ज्ञानेश्वर सोनवणे, जान्हवी जितेंद्र सुर्यवंशी, सुजिता साहेबराव पाटील, हर्षल कन्हैयालाल पाटील, हर्षल बाळू बडगुजर, भुवनेश्वरी खासेराव पाटील, नेहा विजय वाघ, चेतन राजेंद्र चव्हाण, कल्पेश प्रदिप निकम, गीतांजली बारकू पाटील, कुणाल रवींद्र वाणी, हर्षल दिलीप पदमोर, तुषार रतीलाल पाकळे, तुषारकुमार सागर शर्मा, चेतन उल्हास विसपुते, रोहन दिनेश पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली. महाविद्यालयात ट्रेनिंग प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने विविध कंपनींचे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले जात असून यात इन्फोसिस, अॅक्सेंचर, टीसीएस, बायज्युज, पर्सिस्टन्त, डीटीडीसी या सारख्या बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या कंपनी मध्ये आता पर्यंत अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळालेली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग ऑनलाईन माध्यमातून विविध कंपनीशी सातत्याने संवाद करीत असून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मिल्केश जैन यांनी सांगितले.एटोस ग्लोबल कंपनीची मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रा. मिल्केश जैन ,प्रा. एस. एन. परदेशी प्रा. व्ही. एस. रघुवंशी आणि प्रा. व्ही. व्ही. पटेल यांनी परिश्रम घेतलेत.

विद्यार्थाच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाईपटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी.पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे ,परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. डॉ. एस. व्ही. देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन,जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.