Capgemini Campus Selection 2020-21

Capgemini Campus Selection 2020-21

Capgemini Campus Selection 2020-21

येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या अंतीम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या बहुराष्ट्रीय कंपनीत अॅनालीस्ट(विश्लेषक) पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.कॅपजेमिनी एक फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी सल्ला, तंत्रज्ञान, व्यावसायिक आणि आउटसोर्सिंग सेवा प्रदान करते. त्याचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. कॅपजेमिनीचे 50 हून अधिक देशांमध्ये 270,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यापैकी जवळपास 120,000 भारतात आहेत.डिजिटल जगातील क्लायंटला 50-वर्षांच्या सखोल अनुभवातून त्यांच्या व्यवसाय महत्वाकांक्षा लक्षात घेण्यापासून त्याचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी साठीची सेवा पुरवून सक्षम करते.

          आर.सी.पटेल.अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच कॅपजेमिनी कंपनीसाठी, आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील विद्यार्थी ज्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी ६०% गुण आहेत ते विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. तीन स्तरावर झालेल्या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक चाचणी व शेवटी वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली अंतिम वर्षातील संगणक अभियांत्रिकी शाखेतील यश सुधाकर चौधरी, जयदीप दौलत नेरे, हर्षाली यशवंत सावंत, अक्षय पंजाबराव साळुंखे, लोकेश अर्जुन वाणी, विनय नितीन वैद्य, प्रसाद अरुण पाटील, रुतुल अनिल कुलकर्णी, मानसी अभिजित पाटील, श्रुती पंकज मोरे व रोहन नितीन कलाल, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेतील रोहित सुरेश पवार, तन्वी संजय रनदिवे व इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेश  अभियांत्रिकी शाखेतील कीर्ती ताराचंद भावसार व अंकिता सुनील भारंबे या विद्यार्थ्यांची वार्षिक ३.८ लाख वेतश्रेनीवर अॅनालीस्ट (विश्लेषक) या पदावर निवड झाली.

           मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, प्रा.एस.एन परदेशी, प्रा.व्हि.एस.रघुवंशी व प्रा. व्ही. व्ही. पटेल यांनी परिश्रम घेतलेत. महाविद्यालयाच्या ह्या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन,महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.