Celebration of Constitutional Day
Celebration of Constitutional Day
आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात “संविधान दिन” साजरा
आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाअंतर्गत नुकताच & संविधान दिन साजरा करण्यात आला. ह्या दिनाचे औचित्य साधत विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे .बी.पाटील यांनी केले. याप्रसंगी संगणक विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पोस्टर सादरीकरण स्पर्धेच्या आधी प्रा.आशिष पाटील यांनी भारताचे संविधान या विषयी विद्यार्थ्यांना व्याख्याना द्वारे उद्बोधित केले, विद्यार्थाना संविधान आणि त्याचे महत्व, प्रास्ताविकेतील आम्ही भारताचे लोक, सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवाद, धर्मनिरपेक्ष यांचा अर्थ समजावून सांगितला.
पोस्टर स्पर्धेत २९ चमूंनी पोस्टर सादरीकरण केले यात ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर आपल्या कौशाल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी या स्पर्धेद्वारे प्राप्त झाली. पोस्टर सादरीकरणात विद्यार्थांनी मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, घटनेतील विविध संशोधन जसे कि कलम ४२,४४,१०१, कलम ३७०, कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ, राष्ट्रपती व राज्यपाल यांचे अधिकार या विषयावर पोस्टर सादर केलीत .
डॉ.तुषार जावरे आणि प्रा. राहुल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. सेजल सरनाईक आणि जान्हवी अहिरराव, रीना मासुरे आणि दिशा पाटील, पूनम देवरे आणि सानिका जोशी यांच्या चमूंची विजेता म्हणून निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी संगणक विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.दुष्यंत पोतदार आणि प्रा.पल्लवी अग्रवाल यांनी समन्वयक म्हणून तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर विद्यार्थी स्वयंसेवकांमधून पृथ्वीराज शर्मा, यामिनी देशमुख, चेतन शिंपी आणि ओम सोनावणे यांनी परिश्रम घेतलेत.
या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही.तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ.आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्कअधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.