Celebration of Maharashtra Day on 1st May 2023

Celebration of Maharashtra Day on 1st May 2023

Celebration of Maharashtra Day on 1st May 2023

आर. सी. पटेल अभियांत्रिकी मध्ये  महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा


येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला . ह्या दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशात आले होते. महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ह्या वेळी ग्रीन एनर्जी क्लब, टेक्नो ट्रॉन्स क्लब, डिजिटल ड्रीमर्स क्लब ह्या क्लब्ज चे उद्घाटन करण्यात आले. या क्लब्ज च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे संसाधनाचा विवेकपूर्ण वापर व संवर्धन, रोबोटिक्स मधील संधी व संशोधन आणि डीजीटल कलेस योग्य ती चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील.


या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


ह्या वेळी स्टाफ व विद्यार्थ्यांसाठी बेस्ट रील स्पर्धा घेण्यात आली, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या हिरवळीवर फ्लॅश मॉब द्वारे नृत्याविष्कार सादर केला. तसेच विद्यार्थ्यांच्या चमूने समूह गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकलीत. महाराष्ट्रातील लोकप्रिय असे लेझीम नृत्य देखील ह्या वेळी सादर करण्यात आले. महाविद्यालायातील वर्षभर विविध उपक्रम राबविणाऱ्या मोटर स्पोर्ट्स क्लब, अकात्सुकी, डेटा पोलारिस, आर.सी.पी.आय.टी. विंग्स, अथलीमा, समर्पण, रिफ्लेक्शन व अंतरनाद ह्या क्लब्स मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीततेसाठी विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी यांनी संयोजन केले. सदर उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी कौतुक केले.