Electrical Department FDP News

Electrical Department FDP News

Electrical Department FDP News

आर. सी. पटेल अभियांत्रिकीत 'ए. आय. इन इलेक्ट्रिकल सिग्नल अनालिसिस’ कार्यशाळा संपन्न:

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद , इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि येथील आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'ए. आय. इन इलेक्ट्रिकल सिग्नल अनालिसिस’ या विषयावरील इंडक्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची माहिती संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीतील इलेक्ट्रिकल विभागाने 'ए. आय. इन इलेक्ट्रिकल सिग्नल अनालिसिस’ या विषयावरील इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या विद्यमाने केले. ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन ए.आय.सी.टी.ई. चे संचालक डॉ. कर्नल बी. व्यंकट व आय. एस. टी. ई. चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हल्ली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे एक प्रभावी तंत्र म्हणून अस्तित्वात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यामातून स्वायत्त वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सेवा, स्मार्ट ग्रीड, ब्लोक चेन टेकनॉलॉजि इन पावर सिस्टिम, पावर जनरेशन, पूरवठा शृंखला, स्वच्छता व सुरक्षा या सारख्या विविध यंत्रणा जोडून एकात्मिक परिणामासाठी अधिकाधिक संशोधन करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिच्या इलेक्ट्रिकल विभाग, 'अखिल भारतीय तंत्र परिषद’ (AICTE) आणि ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन’ (ISTE) यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ए. आय. इन इलेक्ट्रिकल सिग्नल अनालिसिस’ ह्या कार्यशाळेचे आयोजन कार्यशाळा समन्वयक डॉ. व्ही. एस. पाटील यांच्या नियोजनात दि. २८ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ या दरम्यान करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) या विषयातील मुलभूत संकल्पनांची ओळख आणि त्यातील अल्गोरिदम सारख्या आवश्यक बाबींची माहिती, प्रात्यक्षिक आणि अनुप्रयोग या विषयी सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने, कार्यशाळेसाठी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि तज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आलेले होते. यांत MNIT, जयपुर चे डॉ. राजेश कुमार, डू टान युनिव्हर्सिटी, व्हिएतनाम चे डॉ. आनंद नय्यर, संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयाचे डॉ. किशोर व्ही. भदाणे, आर. आय. टी. साखराळे, सांगली येथील डॉ. व्ही. एन. कलखंबकर, संदीप युनिव्हर्सिटी नाशिक येथील डॉ. राहुल अग्रवाल, हवासा युनिव्हर्सिटी इथोपिया येथील डॉ. बसिम खान, सरदार पटेल महविद्यालय, मुंबई येथील डॉ. बी. एन. चौधरी, वालचंद महाविद्यालय सांगली येथील डॉ. डी. एस मोरे, पेट्रोलियम व एनर्जी स्टडीज युनिव्हर्सिटी, देहरादून येथील डॉ. आदर्श कुमार, DBATU, लोणेरे येथील एस. बी. देवसरकर, RAIT मुंबई येथील डॉ. एम. डी. पाटील, अझीलन टेकनॉलॉजिज मुंबई येथील अभय फांसिकर, VNIT, नागपूर येथील डॉ. एम. एस. बल्लाल, शासकीय अभियांत्रिकी व अमरावती चे डॉ. आर बी शर्मा यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) या प्रणालिंविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच अशोका बिझिनेस स्कूल, नाशिक येथील डॉ. तनया पाटील यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले.

सदर विषयावरील कार्यशाळेचे आयोजन व्यापक पद्धतीने करण्यासाठी 'अखिल भारतीय तंत्र परिषद’ (AICTE) आणि ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन’ (ISTE) ने प्रयोजन केले असून यासाठी आर. सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागतर्फे आयोजन करण्यात आले. ६ दिवसीय कार्यशाळेत सदर विषयाच्या मुलभूत संकल्पनांवर उहापोह करणे, गणितीय संकल्पनांचा AI मधील अल्गोरिदमचा सहसंबंध यावर चर्चा करणे, अद्ययावत नावसंक्ल्पानांचा आढावा घेणे, सहभागी संशोधकांना प्रात्यक्षिक आणि अनुप्रयोगाद्वारे प्रशिक्षण देणे आणि वास्तव आयुष्यातील समस्यावर उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) चा प्रभावी वापर करणे हे या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्टे होती.

सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे, समन्वयक डॉ. व्ही. एस. पाटील. प्रा. नदीम अख्तर, प्रा. योगेश किरंगे, प्रा. भूषण पाटील, प्रा. विनीत पटेल, यांनी परिश्रम घेतले.

या कार्यशाळेच्या यशस्वी संपन्न्तेबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, डॉ. सतीश देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.