RCPIT secured 5 Gold Medals in University Examination 2019-20

RCPIT secured 5 Gold Medals in University Examination 2019-20

RCPIT secured 5 Gold Medals in University Examination 2019-20

विदयापीठ परीक्षांच्या निकालात आर.सी.पटेल अभियांत्रिकीस पाच सुवर्ण पदके
अंतिम वर्षातील २९ विद्यार्थी गुणवत्ता यादीतील प्रथम दहात

शिरपूर: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षातील परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. यात येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखातील विद्यार्थ्यांनी ५ सुवर्णपदके पटकावीत महाविद्यालयाच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. या वर्षीच्या गुणवत्ता यादीत ०५ विद्यार्थ्यांनी प्रथम, ०४ विद्यार्थ्यांनी द्वितीय तर ०१ विद्यार्थ्यांनी तृतीय स्थान मिळवीले असून महाविद्यालयातील अंतिम वर्षातील एकुण २९ विद्यार्थ्यानी प्रथम दहात स्थान मिळवित विद्यापीठाच्या निकालात निर्विवाद वर्चस्व राखले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील यांनी दिली आहे .
कोरोना पार्दुर्भावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अभियांत्रिकी विद्याशाखांच्या परीक्षांचे निकाल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकतेच जाहीर झालेत. यात येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील  माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेतील बिरारी सुचिता संजय, मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतील पाटील करण साहेबराव, इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी शाखेतील चौधरी अश्विनी प्रकाश तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेतील परदेशी दिव्या दिनेशसिंग या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत सुवर्ण पदके पटकाविले आहेत. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या परदेशी दिव्या या विद्यार्थिनीने अभियांत्रिकी शाखेत सर्व मुलींमध्ये विद्यापीठात प्रथम येत दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 

शाखा व वर्ग निहाय निकाल खालील प्रमाणे :-
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी- निकाल १०० टक्के चतुर्थ वर्ष:- निकाल १०० टक्के यात सुवर्ण पदक- परदेशी दिव्या दिनेशसिंग (ग्रेड ९.६१ विद्यापीठात प्रथम तसेच अभियांत्रिकी शाखेत सर्व मुलींमध्ये विद्यापीठात प्रथम ), गुजराथी मधुर अशोक (ग्रेड ९.१३, विद्यापीठात चतुर्थ), पाटील अश्विनी बारकू (ग्रेड ९.०५, विद्यापीठात पाचवी), पाटील जागृती रामचंद्र (ग्रेड ८.९६, विद्यापीठात सहावी), कोठावदे श्रध्दा दिलीप (ग्रेड ८.८२ विद्यापीठात सातवी ).
माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी :
चतुर्थ वर्ष:- निकाल १०० टक्के यात सुवर्ण पदक- बिरारी सुचिता संजय (ग्रेड ९.०८ विद्यापीठात प्रथम), तनेजा मुस्कान मोहन (ग्रेड ९.०५ विद्यापीठात द्वितीय), पाटील नेहा मनोज (ग्रेड ८.९७ विद्यापीठात चतुर्थ), पाटील हर्षदा दिलीप (ग्रेड ८.८९ विद्यापीठात पाचवी), पाटील रोहिणी नीलकंठराव (ग्रेड ८.७२ विद्यापीठात सहावी), शाह सृष्टी भूपेश (ग्रेड ८.६३ विद्यापीठात आठवी), पाटील हितेश राजेंद्र (ग्रेड ८.५१ विद्यापीठात
नववा ).
मेकॅनिकल अभियांत्रिकी:
चतुर्थ वर्ष :- निकाल १०० टक्के यात सुवर्ण पदक- पाटील करण साहेबराव (ग्रेड ९.२९ विद्यापीठात प्रथम), मराठे तेजस प्रकाश (ग्रेड ९.२० विद्यापीठात द्वितिय), वाघ मयूर रवींद्र (ग्रेड ९.१९ विद्यापीठात तृतीय), सूर्यवंशी मयुरेश गोविंदा (ग्रेड ९.०७ विद्यापीठात चतुर्थ), पवार हर्शल नामदेव (ग्रेड ८.९७ विद्यापीठात पाचवा).
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी:
चतुर्थ वर्ष :- निकाल ९८.६३ टक्के यात सुवर्ण पदक - चौधरी अश्विनी प्रकाश (ग्रेड ९.१२ विद्यापीठात प्रथम), वाडीले प्रियंका अशोक (ग्रेड ८.९३ विद्यापीठात चतुर्थ ), ठाकूर दिनेश संतोष (ग्रेड ८.९१ विद्यापीठात सहावा).
सिव्हील अभियांत्रिकी:
चतुर्थ वर्ष :- निकाल १०० टक्के यात हजारी हर्षिता मनोजसिंग (ग्रेड ९.३६ विद्यापीठात द्वितीय), शिरसाठ हर्षदा दिलीप (ग्रेड ९.१८ विद्यापीठात सातवी), बोरसे स्नेहल दिलीप (ग्रेड ९.०७ विद्यापीठात दहावी).

संगणक अभियांत्रिकी:
चतुर्थ वर्ष :-निकाल ९९.३३ टक्के यात महाजन श्वेता दत्तात्रय (ग्रेड ९.२६ विद्यापीठात द्वितिय), निकुम सौरभ (ग्रेड ९.१४ विद्यापीठात चतुर्थ ), धमानी रविना गोविंद (ग्रेड ९.१० विद्यापीठात पाचवी), अग्रवाल श्रेया विजय (ग्रेड ८.८९ विद्यापीठात दहावी), आखड्मल अमिषा भालेराव (ग्रेड ८.८९ विद्यापीठात दहावी) .

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल , सचिव प्रभाकर चव्हाण , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. प्रवीण सरोदे , प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. व्ही. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले आहे.

प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील :-

या वर्षी कोरोना विषाणूच्या पादुर्भावामुळे शासकीय निर्बंधाचे पालन करीत महाविद्यालयाने काटेकोर नियोजन करून वेबेक्स व झूम च्या माध्यमातून द्वितीय सत्रात तासिका व प्रात्यक्षिके ऑनलाईन पद्धतीने घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयाने मूडलप्रणालीच्या द्वारे भरपूर सराव परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे सातत्य कायम राखले होते याचाच फायदा विद्यार्थ्यांना झाला असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.
राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षणाचा कायाकल्प व्हावा या साठी राज्य शासनाने सुरु केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी महाविद्यालय २०१७ पासून संलग्न झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महाविद्यालयाची हि शेवटची बँच व निकाल होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत आत्ता पर्यंत महाविद्यालयाने एकुण ४७ सुवर्ण पदके पटकावली असून निकालात अनेक कीर्तिमान स्थापित केलेले आहेत याचेच समाधान आहे.शैक्षणिक गुणवत्तेसह सॉफ्ट स्कील,व्यक्तीमत्व विकास, मुलाखत तंत्र मार्गदर्शन या सह राबविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणे व उपक्रमांमुळे महाविद्यालयाला प्लेसमेंट मध्येही उल्लेखनीय यश प्राप्त होत असुन या वर्षीही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विविध कंपनीत उच्च वेतन श्रेणीवर निवड झालेली आहे.