GHRDC Ranking News

GHRDC Ranking News

GHRDC Ranking News

GHRDC २०२३ सर्व्हेक्षणात पटेल अभियांत्रिकी राष्ट्रीय पातळीवर ७६ तर महाराष्ट्रातून ९ व्या स्थानी:

शिरपूर: ‘ग्लोबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर’ (GHRDC) तर्फे अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकीने अनेक निकषांना खरे ठरत देशपातळीवर ७६ वे तर महाराष्ट्रात ९ वे स्थान प्राप्त केल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.


‘ग्लोबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर’ (GHRDC) ची संकल्पना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन व्यावसायिकांच्या गटाने १९९७ च्या सुरुवातीस केली होती. हि संस्था मुख्यतः व्यवसाय व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि हॉटेल व्यवस्थापन या क्षेत्रात शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात १५ वर्षांपासून मौल्यवान योगदान देत आहे. GHRDC च्या सर्वेक्षणातील माहिती आणि मानांकन शैक्षणिक संस्था, इच्छुक विद्यार्थी आणि भर्ती करणारे उद्योजक या सर्व महत्त्वाच्या भागधारकांना अतिशय फायदेशीर ठरत आहे. गुणवत्ता, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेमध्ये सातत्य ठेवण्याची परंपरा कायम ठेवत, GHRDC २००९ पासून भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी सर्वेक्षण करत आहे. तेव्हापासून ते आपल्या भागधारकांसाठी दरवर्षी यशस्वीपणे सर्वेक्षण करत आहे. या सर्व्हेक्षणात अनेक बाबी समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यांत महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर शैक्षणिक सुविधा, प्राध्यापक, अध्यापनशास्त्र, संशोधन अभिमुखता, विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, विद्याशाखा आणि त्यातील अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती, उद्योग संवाद, प्लेसमेंट आणि सामाजिक भान ह्या प्रमुख मापदंडांचा समावेश करण्यात आला होता. ह्या सर्व निकषांच्या आधारावर महाविद्यालयाला सर्वे मध्ये लक्षणीय स्थान प्राप्त झाले. यानुसार आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने GHRDC-२०२३ सर्व्हेक्षणात देशपातळीवर ७६ वे तर महाराष्ट्रात ९ वे स्थान प्राप्त केले.


महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.