Honoring the Sanitation Workers

Honoring the Sanitation Workers
आर. सी. पटेल अभियांत्रिकीत स्वच्छता दुतांचा सन्मान
शिरपूर: येथील ०१ मे, या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांच्या हस्ते सर्व मेहनती स्वच्छता कामगारांना सन्मानित करण्यात आले.
पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महविद्यालयीन परिसरात स्वच्छता राखण्यासाठी येथील स्वच्छता कामगार संपूर्ण वर्षभर अविरतपणे कार्यरत असतात. महाविद्यालयात हजारो विद्यार्थी आणि शेकडो कर्मचारी यांचा दिवसभर वावर असतो. याचबरोबर मोठ्या संख्येने असलेल्या प्रयोगशाळा, वर्ग, शिक्षक दालने, कार्यालये, ग्रंथालय, कँटीन आणि प्रशस्त लॉन यांची दैनंदिन स्वच्छता व निगा राखणे हे एक प्रकारे महत्वाचे कार्य आहे. सदर कार्यासाठी महाविद्यालयात शिपाई कर्मचार्यांसोबत स्वच्छता कामगार साफ सफाईचे काम नित्यनेमाने करीत असतात. या स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी यांचे आरोग्य आणि परिसर सुंदर व सुरक्षित आहे. या भावनेतूनच स्वच्छता दूतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन कामगार दिनी करण्यात आले होते. यावेळी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू व फळे देण्यात आली.
त्या बद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानले. या सन्मान सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे, संगणक विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी आयोजनासाठी प्रा. दुष्यंत पोतदार, प्रा. पल्लवी अग्रवाल, विद्यार्थी प्रतिनिधी गौरव लोखंडे, यामिनी देशमुख, पृथ्वीराज शर्मा, खुशी अग्रवाल,
चेतन शिंपी, मंगेश भिडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
स्वच्छता दूतांचा सन्मान सोहळा या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे,
परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एम. पी. जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.