Infosys Placement News

Infosys Placement News

Infosys Placement News

शिरपूर: येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या ०३ विद्यार्थ्यांची इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत इन्फी-TQ च्या निवड प्रक्रीयेद्वारे ट्रेनी सॉंफ्टवेर इंजिनिअर या पदावर वार्षिक रु. ३.६ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

सदर कंपनी व पटेल अभियांत्रिकी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. इन्फोसिस कंपनीस सुमारे चार दशकांपासून जागतिक स्तरावरील उद्यमांच्या यंत्रणेचे व्यवस्थापन कार्याचा अनुभव आहे. उद्योग जगताच्या डिजिटलायझेशनच्या वाटचालीत इन्फोसिस कंपनी कुशलतेने योगदान देत आहे. ए.आय. तंत्रज्ञानाच्या जोरावर अभूतपूर्व कामगिरी करत औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना व्यवसायात डिजिटली सक्षम करण्याचे कार्य इन्फोसिस प्राधान्याने करत आहे. याच सोबत पर्यावरणातील संकल्पनांचे हस्तांतरण करत कंपनी स्वतः देखील अनेक नाविन्य पूर्ण सुधारणा करत आहे. आज इन्फोसिस हि भारतीय कंपनी ४० हून अधिक देशांमध्ये सेवा प्रदान करत असून जगभरात डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात नेतृत्व करत आहे.
याच बरोबर कंपनीच्या अनेक प्रकल्पामार्फत मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. हुशार आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची जान असलेले अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस कंपनी मध्ये अभियंता म्हणून रुजू होणे हे स्वप्न असते. यासाठी कंपनी तर्फे इन्फी टी. क्यू. हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे अनेक स्तरावर परीक्षण केले जाते. यशस्वी विद्यार्थी इन्फी टी. क्यू. प्रमाणित केले जातात आणि याचाच अर्थ ते इन्फोसिस कंपनीत सेवा बजावण्यास कार्यक्षम आहेत व त्यांना विविध पदांवर नियुक्ती दिली जाते.
पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. दोन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता आणि तांत्रिक चाचणी झाली. त्यात आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या विनय वैद्य, ऋतूल कुलकर्णी आणि योगेश पाटील या ०३ विद्यार्थ्यांची ट्रेनी सॉंफ्टवेर इंजिनिअर या पदावर वार्षिक रु. ३.६ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली. निवड प्रक्रियेच्या यशस्वितेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, प्रा.एस. एन.परदेशी यांनी परिश्रम घेतलेत.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन,जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.