Kargil Vijay Diwas Celebration

Kargil Vijay Diwas Celebration
पटेल अभियांत्रिकीत माजी सैन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करत ‘कारगिल विजय दिवस’ साजरा:
शिरपूर: येथिल पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थी आणि शिक्षक यांनी 2६ जुलै रोजी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यासाठी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील ३० सेवानिवृत्त लष्करी अधिकार्यांना आमंत्रित करून वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत १०० हून अधिक वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम हाती घेतला.
2६ जुलै, याच दिवशी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तान च्या सैन्याला भारतीय सीमेतून हाकलून लावतआपल्या विजयाचा ध्वज कारगिल येथे फडकावला होता. भारतीय सैन्याच्या या शौर्याच्या स्मृती साजरी करण्यासाठी हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजर केला जातो. यानिमित्ताने आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थीपरिषदेच्या ‘समर्पण’ या समूहाकडून अभिनव उपक्रम राबिवण्यात आला. यात शिरपूर शहर आणि परिसरातील भारतीय लष्करात विविध पदांवर सेवा बजावलेल्या निवृत्त सैनिकांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करवून घेतले. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन, जुलै-ऑगस्ट या कालावधीत दर वर्षी वृक्षलागवडीचा महोत्सव साजरा केला जातो. कारण हा ओला ऋतू झाडांच्या वाढीसाठी चांगला मानला जातो. या हंगामात झाडे लवकर वाढतात. म्हणून ‘कारगिल विजय दिवस’ आणि पावसाळा या दोन्ही वेळांचे महत्व लक्षात घेत माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून सैनिक आणि आणि पर्यावरण या दोघांबद्दल कृतज्ञता आणि सन्मानाची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित माजी सैनिकांकडून कारगिल युद्धात घडलेल्या घडामोडी बद्दल माहिती घेतली. माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे विद्यार्थ्यांना समजवून सांगितले. या साहसी किस्स्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर प्रभाव टाकला, ज्यामुळे विद्यार्थी भारतीय सशस्त्र दलांबद्दल अधिक कृतज्ञ झाले. तसेच यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणत कार्यक्रमाची सांगता केली. वृक्षारोपणासाठी शिरपूर शहरातीलच युवा व्यावसायिक श्री प्रीतम पाटील यांनी १०० हून अधिक निरनिराळ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करवून देत पटेल अभियांत्रिकीच्या या अभिनव उपक्रमात सहभाग घेतला.
‘कारगिल विजय दिवस’ आणि वृक्षारोपण या उपक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी परिषदेच्या अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले व यासाठी ‘समर्पण’ समूहाचे विद्यार्थी- सदस्य विशाल वंजारी, गायत्री पाटील, अंजली पवार, निखिल पाटील, कुणाल सोनार, सिद्धी कुलकर्णी, राहुल शर्मा, अभय कोठावदे आणि मानस गाडीलोहार यांनी विशेष परीश्रम घेतले.
या स्तुत्य उपक्रमच्या यशस्वीतेबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.