Lady Engineer Awards News

Lady Engineer Awards News

Lady Engineer Awards News

इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स तर्फे डॉ.शैलजा पाटील यांना लेडी इंजिनियर्स अवार्ड:

दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेंटरतर्फे आउटस्टैंडिंग पुरस्कारासह अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अभियंत्यांचा वार्षिक अभियांत्रिकी पुरस्कार सोहळा नुकताच हॉटेल गेट-वे नाशिक येथे पार पडला त्यात आर.सी.पटेल अभियांत्रिकी मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्रा.डॉ. शैलजा पाटील यांना लेडी इंजिनियर्स अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना सदर पुरस्कार दिले जातात.

इन्स्टिट्यूटच्या नाशिक लोकल सेंटरची स्थापना १९८४ साली झाली. आज २५०० हून अधिक सभासद व सुमारे ९५०० तंत्रज्ञ सदस्य या सेंटरचे आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मॅन्युफैक्चरिंग ऑपरेशन्स) के. जी. शेणॉय व हिंदुस्थान एरोनॉटिक्स ली.चे सी.ई.ओ . डी.मैती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . आज जगात कोठेही जेव्हा एखादे नवीन तंत्रज्ञान विकसित होते, त्या तंत्रज्ञानाची भारतात देखील त्याच क्षणी निर्मिती होते. सध्याच्या काळात परिवर्तनाचा वेग वाढला असून, स्वतःला त्वरित परिवर्तीत करणे काळाची गरज

आहे. पुरस्कारप्राप्त अभियंत्यांसह नाशिक लोकल सेंटर चे अध्यक्ष सुमित खिवसरा, मानद सचिव समीर कोठारी, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) महाराष्ट्र स्टेट सेंटर चे अध्यक्ष महेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रा.डॉ. शैलजा पाटील ह्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे संशोधन हे फेस रिकगनिशन , बायोमेट्रिक्स, डिजिटल इमेज प्रोसेसिंग, कॉम्प्युटर व्हिजन आणि डिजिटल सिग्नल यांच्यावर आधारित आहे. त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, 27 आंतरराष्ट्रीय जर्नल्स व 04 राष्ट्रीय जर्नल्स मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत , 22 आंतरराष्ट्रीय

परिषद, 17 राष्ट्रीय परिषद, 08 पोस्टर प्रेझेंटेशन आणि 61 कार्यशाळेत त्यांनी यशस्वी सहभाग घेतला आहे. यु.जी.सी. व क.ब.चौ. उ.म.वि.जळगाव तर्फे त्यांच्या संशोधन कार्यासाठी संशोधन अनुदान देखील मिळाले आहे. दूरसंचार चोरी नियंत्रण प्रणालीवर एका पेटंट ला मंजुरी मिळाली आहे. या व अशा अनेक शैक्षणिक कार्यातील सहभाग व योगदान लक्षात घेता त्यांना सदर अवार्ड मिळाला.

या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.