TCS Campus Placement News 2021-22 Batch

TCS Campus Placement News 2021-22 Batch

TCS Campus Placement News 2021-22 Batch

आर सी पटेल अभियांत्रिकीच्या ५७ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस(TCS) मध्ये निवड:

या वर्षीच्या सुरुवातीलाच विविध कंपनीत ३६० प्लेसमेंट:

 

शिरपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील अग्रगण्य अश्या टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस (TCS) तर्फे नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीत येथील आर.सी.पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महविद्यालयातील ५७ विद्यार्थ्यांची असिस्टंट सिस्टिम इंजीनीअर या पदासाठी वार्षिक रु.३.३६ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली आहे. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच महाविद्यालयातील ३६० विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपनीत प्लेसमेंट मिळाले असून अजून अनेक कंपनीची निवड प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली.


सुप्रसिध्द टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस, पुणे (TCS) कंपनी चे जगभरातील ४६ देशात २३० कार्यालये असुन माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ३ लाख हून अधिक तज्ञ सल्लागार कार्यरत आहेत. जागतिक बाजारात सॉफ्टवेअर निर्यातीत टी.सी.एस. सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात सदर कंपनीने लक्षावधी डॉलर चा व्यवसाय केला आहे. अश्या अग्रगण्य कंपनीतर्फे प्लेसमेंट साठी महाविद्यालयांचे मानांकन केले जाते. उत्तर महाराष्ट्रात आर. सी. पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महविद्यालयास हे मानांकन मिळालेले आहे.


महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने कंपनी साठी नुकतेच कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले होते. यात कंपनीच्या TCSion या पोर्टल मार्फत राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया राबिवण्यात आली. या प्रक्रियेच्या मधून यशस्वी रित्या पुढे जात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची असिस्टंट सिस्टिम इंजीनीअर पदावर थेट निवड झाली. तसेच शिरपूर येथे महाविद्यालयात सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट व मुलाखत घेण्यात आल्या यात पवार प्रणाली प्रवीण, ढोले वैष्णवी लालचंद, चव्हाण शुभम राजेश, बडगुजर विपुल राजेंद्र, पाटील संदिप राजेंद्र, सूर्यवंशी प्रज्वल अशोक, गिरसे सागरसिंग हिम्मतसिंग, भावसार श्रुतिक सुदाम, पाटील राज जितेंद्र, चौधरी यशोधन संजय, अग्रवाल पलक विजय, पाटील प्रेमल भगवान, जैन यशिका विशालकुमार, बच्छाव दिपाली प्रदिप, सोनवणे जयदीप किशोर, सपकाळे रुषिकेश दिपक, पाटील कल्पेश कल्याण, चौधरी जयेश भरत, सावळे प्रतीक अनिल, चौधरी सागर जितेंद्र, नांद्रे धनश्री सुनील, चौधरी नेहा ज्ञानेश्वर, महाजन चेतन जितेंद्र, पाटील जयेश जितेंद्र, सावंत घनशाम उद्धव, पाटील योगेश्वरी नरेंद्र, महेश्वरी राशी अजय, बाविस्कर राजन चंद्रशेखर, पाटील शिवानी विलास, शेख शोएब सगीर अहमद, चौधरी सौरभ मनोहर, पाटील प्रतिक्षा प्रवीण, परदेशी करनसिंग गणेशसिंग, अग्रवाल आदिती विजय आणि पाटील हर्षिता यादवेश्वर जान्हवी जितेंद्र सुर्यवंशी, निकिता रवींद्र गवळे, नेहा विजय वाघ,
गायत्री नंदकिशोर भैरव, नेहा रामकुमार दुसेजा, गौतमी नंदकिशोर भैरव, भावेष दगा मेटकर आणि निकिता धनराज माळी, तुषारकुमार सागर शर्मा आणि वैभव संतोष कुवर. जितेंद्र मोहन हिवरकर, भावेश दिलीप खैरनार, जितेंद्र कैलास महाजन, राज प्रदिप शिंदे, दीपक रामकृष्ण पाटील, यशोदिप सुकदेव सुर्यवंशी, मयूर रविकांत लोखंडे, पवन राजेश माळी, हर्षाली महेश कुलकर्णी आणि परेश रवींद्र पाटील. अजय भगवान पाटील, याप्रमाणे एकूण ५७ विद्यार्थ्यांची वार्षिक रु.३.३६ लाख या वेतनश्रेणीवर असिस्टंट सिस्टिम इंजीनीअर या पदासाठी स्तुत्य निवड झाली आहे. आजमितीस महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले ४५० हुन अधिक विद्यार्थी टी.सी.एस. कंपनीत विविध पदांवर कार्यरत आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मिल्केश जैन, प्रा. एस. एन. परदेशी, प्रा. व्ही. एस. रघुवंशी, प्रा. पी. एस. पाटील व प्रा. व्ही. व्ही. पटेल ,प्रा.व्ही.जे.पटेल यांनी विशेष प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. प्रवीण सरोदे,डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.