पटेल अभियांत्रिकीच्या १६ विदयार्थ्यांची ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर पदासाठी निवड:

पटेल अभियांत्रिकीच्या १६ विदयार्थ्यांची ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर पदासाठी निवड:

22 Jul 2023   Electronics & Telecommunication Engineering

पटेल अभियांत्रिकीच्या १६ विदयार्थ्यांची ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर पदासाठी निवड:

शिरपूर: येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, संगणक इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील १६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे हेक्सावेअर या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी वार्षिक रु. ४ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

हेक्सावेअर टेक्नोलोजीज हि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरात एकूण ३३ पेक्षा जास्त कार्यालयातून माहिती तंत्रज्ञासंबंधित सेवा पुरविण्याचे कार्य सदर कंपनी करत आहे. यांत बँकिंग, शिक्षण, ट्रेडिंग मार्केट, वाहतूक आणि दळणवळण, मॅन्युफॅक्चरिंग, पर्यटन, इत्यादी प्रकारच्या दुसऱ्या कंपनींना आवश्यक असलेले माहिती तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उत्पादने आणि त्यासंबंधित सेवा पुरविण्याचे काम करते. म्हणूनच हेक्सावेअर या कंपनीस आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार आणि मानांकन प्राप्त झाले आहेत. सदर कंपनीतर्फे आर. सी. पटेल अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑन कँपस ड्राईव्ह चे आयोजन केले होते. पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. दोन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला अभियोग्यता आणि तांत्रिक चाचणी झाली. यानंतर वयक्तिक आणि तांत्रिक मुलाखतीच्या फेऱ्या झाल्या. यांत यशस्वीरीत्या पुढे जात संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेतील जय अनिल बोदाडे, हितेश साहेबराव मराठे, गौरव मनोज चव्हाण, भूषण महादू पाटील, शुभम कौशिक व्होरा, शिवांग कौशिक व्होरा, सौरभ प्रदिप पाटील, विनित युवराज नेहेते, अश्विनी परमेश्वर लुकाडे, जागृती राजेंद्र वाघ, ऋषिका अतुल शर्मा, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विद्याशाखेतील कार्तिक सुभाष कानडे, जुही विजय मेने, यामिनी संजय मेने, सायली हिरामण उघाडे आणि इलेक्ट्रिकल विद्याशाखेतील मोहित रवींद्र पाटील या १६ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी वार्षिक रु. ४ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली. महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या संवाद कौशल्य, अभियोग्यता चाचणी, प्रशिक्षण आणि चाचणी मुलाखती, करिअर प्लॅनिंग, मुलाखत तंत्र, गट चर्चा इ. उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना निवडप्रक्रियेला सामोरे जातांना झाला. या उपक्रमांसाठी आणि महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. मिल्केश जैन, समन्वयक प्रा. मयूर पाटील, प्रा. अनुपकुमार जयस्वाल आणि प्रा. विनीत पाटील यांनी परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.