आर.सी.पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाला एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये राज्यात १४ वे स्थान

19 May 2026   Mechanical Engineering

आर.सी.पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाला एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये राज्यात १४ वे स्थान

आर.सी.पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाला एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंगमध्ये राज्यात १४ वे स्थान
शिरपूर : येथील स्वायत्तता दर्जा प्राप्त तसेच उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तेच्या बळावर एज्यूकेशन वर्ल्ड सर्वेक्षण २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या सर्वेक्षणात महाविद्यालयाने महाराष्ट्रातील अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १४ वे स्थान तर राष्ट्रीय स्तरावर ८० वे स्थान मिळवत आपली भक्कम ओळख कायम राखली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.