जीएचआरडीसीच्या सर्व्हेक्षणात आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीला राज्यपातळीवर चौथे स्थान
21 Jun 2026 Mechanical Engineering
जीएचआरडीसीच्या सर्व्हेक्षणात आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीला राज्यपातळीवर चौथे स्थान
शिरपूर : व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील ग्लोबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर (जीएचआरडीसी) द्वारे २०२६ चे राष्ट्रीय सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये येथील आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विविध निकषांवर खरे उतरत महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट तंत्रज्ञान शिक्षण श्रेणीत देशभरात ३७ वे, तर महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चौथे स्थान पटकावले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

