आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीचे स्वाविद्यालयात अभियांत्रिकी डॉ. निलेश शिंदेना पीएच. डी. प्रदान

आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीचे स्वाविद्यालयात अभियांत्रिकी डॉ. निलेश शिंदेना पीएच. डी. प्रदान

18 May 2026   Mechanical Engineering

आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीचे स्वाविद्यालयात अभियांत्रिकी डॉ. निलेश शिंदेना पीएच. डी. प्रदान

आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीचे स्वाविद्यालयात अभियांत्रिकी डॉ. निलेश शिंदेना पीएच. डी. प्रदान
अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले प्रा. निलेश मोहन शिंदे यांना मेडीकॅप्स विद्यापीठ, इंदोर, मध्य प्रदेश येथून यांत्रिकी अभियांत्रिकी विषयात पदवी प्रदान
डॉक्टरेट करण्यात आली.
परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ऑफ सोलर एअर हीटर विथ इंटिग्रेशन ऑफ ऑर्गुमेंटेड अबसॉर्बर प्लेट हा डॉ. निलेश शिंदे यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. या संशोधनामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातील सोलर एअर हीटरची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हेक्सागोनल रिब्सयुक्त अबसॉर्बर प्लेटचा वापर करून उष्णता हस्तांतरण व थर्मो-हायड्रॉलिक कार्यक्षमतेचा सखोल अभ्यास करण्यात आला
आहे. या संशोधनामध्ये सर्क्युलर डक्ट सोलर एअर हीटरमध्ये विविध ब्लॉकेज अनुपात आणि रिब अँगलच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरणामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सिद्ध करण्यात आले. विशेषतः हेक्सागोनल रिब्समुळे हवेच्या प्रवाहामध्ये अधिक टर्ब्युलन्स निर्माण होऊन उष्णता हस्तांतरणात सुधारणा झाल्याचे आढळून आले. या संशोधनातून
सौर ऊर्जा उपकरणांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रभावी व आर्थिकदृष्ट्या उपयुक्त तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ऊर्जा बचत, औद्योगिक प्रक्रिया, कृषी क्षेत्रातील सौर उष्णता प्रणाली तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांच्या विकासासाठी हे संशोधन भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना मेडीकॅप्स विद्यापीठ, इंदोर येथून संशोधन मार्गदर्शक डॉ. हिमांशू बोराडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कालावधीत त्यांनी स्कोपस सूचीबद्ध नियतकालिकांमध्ये संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित केले असून विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन आपल्या संशोधनाचे सादरीकरण
केले आहे. या संशोधन कार्यात डॉ. शिंदे यांना त्यांचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण सरोदे आणि सहकारी प्राध्यापकांचे विशेष सहकार्य मिळाले.