आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल (NPTEL) परीक्षेत यश
21 Jul 2026 Mechanical Engineering
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विद्याशाखेच्या प्राध्यापकांनी 'नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग (एनपीटीईएल) परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत आयआयटी आणि आयआयएससी तर्फे संचालित उच्च तंत्र शिक्षणातील अभ्यासक्रम पूर्ण करत महाविद्यालयाच्या तब्बल ५७ प्राध्यापकांनी हे यश मिळवले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

