News Details
10 Aug 2026 Mechanical Engineering
पटेल स्वायत्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींची रोजगार क्षमतेकडे वाटचाल
आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात महिंद्रा प्राईड नांदी फाउंडेशन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला. महिंद्रा ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रकल्पाअंतर्गत आणि नांदी फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील ३० विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करून त्यांना उद्योगजगतातील संधींसाठी सक्षम करणे हा होता.

